स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर हा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विक्रमी आठव्या विजेतेपदासाठी उत्सुक असून त्याला रविवारी येथे अंतिम लढतीत अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच या सर्बियन खेळाडूचा अडथळा पार करावा लागणार आहे.
फेडररच्या नावावर विक्रमी सतरा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे आहेत. मात्र गेली दोन वर्षे ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून वंचित राहिला आहे. येथे त्याने आतापर्यंत सात वेळा अजिंक्यपद पटकाविले आहे.
२०१२ मध्ये या दोघांमध्ये झालेल्या मुकाबल्यात फेडररने बाजी मारली होती. जोकोव्हिच याने आतापर्यंत सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. येथे त्याने २०११ मध्ये अिजक्यपद पटकाविले होते. त्याला गतवर्षी येथील अंतिम लढतीत अँडी मरे याच्याकडून तर अमेरिकन स्पर्धेतील अंतिम फेरीत राफेल नदालकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नुकत्याच झालेल्या फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याला नदालनेच हरविले होते. जोकोव्हिच याला येथे यंदा अंतिम फेरीत स्थान मिळविताना खूपच झगडावे लागले आहे. उपांत्य फेरीत त्याला ग्रिगोर दिमित्रोव्ह याच्याविरुद्ध विजय मिळविताना संघर्ष करावा लागला आहे.
जोकोव्हिचला माजी विजेते बोरिस बेकर यांचे तर फेडररला माजी विजेते स्टीफन एडबर्ग मार्गदर्शन करीत आहेत. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत ३५ वेळा लढती झाल्या आहेत. त्यापैकी अकरा वेळा ते ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा