विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी उपस्थित असलेले सेलिब्रिटी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नोवाक जोकोविच आणि रिचर्ड गॅस्केट यांच्यात शुक्रवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्याच्यावेळीही अनेकांच्या नजरा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीकडे लागल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी सचिनबरोबर त्याची पत्नी अंजली तर विराटबरोबर त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा उपस्थित होती. अशाप्रकारचा दुर्मिळ योग जुळून आल्यानंतर त्याची चर्चा होणे हे ओघाने आलेच. विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एकमेकांच्या बाजुला बसलेल्या सचिन आणि कोहलीचे छायाचित्र सध्या क्रीडा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सचिन तेंडुलकर रॉजर फेडररच्या खेळाचा चाहता असून त्याने यापूर्वीही विम्बल्डनच्या सामन्यांना हजेरी लावली आहे. याशिवाय, युवराज सिंगनेही काही दिवसांपूर्वी रॉजर फेडरर खेळत असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला हजेरी लावली होती. तर इंग्लंडच्या अँडी मरेचा सामना पाहण्यासाठी माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स-केट मिडलटन उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा