विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी टेनिस जगताचा सुपरस्टार रॉजर फेडररचे चाहते राहिले आहेत. क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने रॉजर फेडररच्या सामन्यांना अनेकवेळी उपस्थिती लावली आहे. स्वत: सचिननेही आपण फेडररचा चाहता असल्याचे म्हटले होते. फेडररच्या चाहत्यांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडररचा सामना पाहण्यासाठी थेट लंडन गाठले. रॉजर फेडरर विरुद्ध गाइल्स सिमॉन यांच्यात रंगलेल्या उपांत्यपूर्वी फेरीच्या सामन्याला युवराज सिंग उपस्थित होता. वयाच्या ३३व्या वर्षीही तरुणांना लाजवणारी ऊर्जा घेऊन विम्बल्डन स्पर्धेत उतरलेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे. युवराजच्या या आवडत्या टेनिनसपटूने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकून मोठ्या दिमाखात स्पर्धेची उपांत्य फेरी देखील गाठली आहे. टेनिस कोर्टवर आजवर अनेक मातब्बरांनी उपस्थिती लावली आहे. नुकतेच अँडी मरेच्या सामन्यावेळी माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स-केट मिडलटन उपस्थित होते.

Story img Loader