Wimbledon 2018 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल या दोघांमध्ये विम्बल्डनचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात येणार होता. पहिला उपांत्य सामना संपला की हा सामना सुरु करण्यात येणार होता. मात्र केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नरला अँडरसन यांच्यात झालेला पहिला उपांत्य सामना हा तब्बल ६ तास ३६ मिनिटे लांबला. त्यामुळे नदाल आणि जोकोव्हिच दोघांना आपल्या सामन्याची वाट पाहावी लागली.

पहिला सामना संपल्यानंतर त्याच कोर्टवर दुसरा उपांत्य सामना खेळवण्यात येणार होता. हा सामना संपण्याची वाट पाहत बसलेल्या जोकोव्हिचने ड्रेसिंग रूममध्येच वेळ घालवण्याचे साधन शोधले. त्याने चक्क मधल्या वेळेत ड्रेसिंग रूममध्ये गोट्यांचा डाव मांडला आणि गोट्या खेळायला सुरुवात केली. जोकोव्हिचने स्वतः याबद्दल ही पोस्ट इंस्टाग्रामच्या स्टोरी प्रकारात पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये त्याने ‘मी सामन्याची वाट पाहत असताना गोट्या खेळत आहे’, असे लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,पहिला सामना आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चालणारा उपांत्य सामना ठरला. या सामन्यात केव्हिन अँडरसन याने जॉन इस्नरला नमवून प्रथमच अंतिम फेरीमध्ये धडक दिली. अँडरसनने ७-६, ६-५, ६-७, ६-४, २६-२४ अशा फरकाने त्याला पराभूत केले.