Wimbledon 2018 : ग्रास कोर्टवरील टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर याचा बुधवारी विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने फेडररवर ६-२, ७-६ (७-५), ५-७, ४-६, ११-१३ अशी मात केली. या विजयासह केविनने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

हा सामना तब्बल सव्वाचार तास चालला. चुरशीच्या लढतीत अँडरसनने फेडररवर थरारक विजयाची नोंदवला. फेडररला सामन्यात विजयाची संधी मिळाली, मात्र अँडरसनने तिसऱ्या सेटमध्ये फेडररकडून मॅच पाँईट हिरावून घेतला. पहिला सेट फेडररने ६-२ असा आरामात जिंकला. त्या सेटमध्ये फेडररच्या चौफेर खेळापुढे अँडरसनकडे कुठलेही उत्तर नव्हते. त्यानंतर मात्र दुसरा, चौथा आणि पाचवा सेट जिंकून त्याने फेडररवर विजय मिळवला. पण हाच खेळाडू एकदा आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याच्याकडून पराभूत झाला होता.

केविन अँडरसन एका मुलाखतीदरम्यान बोलत होता. युवा टेनिसमध्ये एबी डिव्हिलियर्स हा निष्णात खेळाडू होता. तो माझ्यापेक्षा २ वर्षे वरिष्ठ होता. आम्ही एकत्र अनेक सामने खेळायचो. एका सामन्यात तर मला एबी डिव्हिलियर्सने पराभूत केले होते. इतकेच नव्हे तर तो सामना मी सरळ सेटमध्ये पराभूत झालो होतो, असे त्याने सांगितले.

Story img Loader