Wimbledon 2018 Women’s Single Final : विम्बल्डन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये अंतिम सामन्यात आज ११व्या मानांकित जर्मनीच्या अँजेलिक कर्बर हिने २५व्या मानांकित सेरेना विल्यम्सला ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयासह तिने आपले पहिलवहिले विम्बल्डन विजेतेपद तर तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्यारत्न झाल्यानंतर सेरेनाने या स्पर्धेतून टेनिसमध्ये ‘कमबॅक’ केले होते. त्यामुळे सेरेनाच्या या स्पर्धेकडून फार अपेक्षा होत्या. त्यानुसार सेरेनाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण अंतिम सामन्यात तिच्याकडून लौकिकाला साजेसा खेळ झाला नाही. कर्बरने सामन्यावर सुरुवातीपासून वर्चस्व राखले होते. कर्बरला सेरेनाकडून कडवी झुंज देण्यात येईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला.

या विजयासह कर्बरने आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. हे तिच्या कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. याआधी कर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे प्रत्येकी १ विजेतेपद पटकावले होते. तिने हि दोन्ही विजेतेपदे २०१६ साली पटकावण्याची किमया केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon 2018 womens single final serena williams angelique kerber 1st victory