लंडन : अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने २०१८च्या विजेत्या अँजेलिक केर्बर हिचा सरळ सेटमध्ये पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे. आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने दुसऱ्या मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बार्टीची मार्गदर्शक इव्होनी कावली यांनी १९८०मध्ये दुसऱ्या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर विम्बल्डची अंतिम फेरी गाठणारी २५ वर्षीय बार्टी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. बार्टीने केर्बरचा ६-३, ७-६ (७/३) असा पराभव केला. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये केर्बरच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते. केर्बरने दुसऱ्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली होती. पण बार्टीने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत टायब्रेकमध्ये हा सेट जिंकला. आता बार्टीला अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी लढत द्यावी लागेल.

दुसऱ्या उपांत्य लढतीत प्लिस्कोव्हाने बेलारूसच्या सबालेंकाला ५-७, ६-४, ६-४ असे हरवले. पहिल्या सेटमध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ करत ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सबालेंकाने प्लिस्कोव्हाची सव्‍‌र्हिस भेदत पहिला सेट आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र जोमाने पुनरागमन करत प्लिस्कोव्हाने ४-२ अशी आघाडी घेत सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्येही दमदार खेळ करत प्लिस्कोव्हाने प्रथमच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली.

तत्पूर्वी, इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनीने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियास्सिमे याचा ६-३, ५-७, ७-५, ६-३ असा पाडाव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. आता उपांत्य फेरीत पोलंडच्या हुबेर्ट हुर्काझ याच्याशी लढत द्यावी लागेल. हुर्काझने स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररवर मात केली होती.

ओसाकाला जोकोव्हिच, फेल्प्सचा पाठिंबा

मानसिक नैराश्येमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जपानच्या नाओमी ओसाकाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल, अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच, २३ ऑलिम्पिक सुवर्णपदके पटकावणारा अमेरिकेचा माजी जलतरणपटू मायकेल फेल्प्स तसेच अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टीफन करी यांचा पाठिंबा लाभला आहे.