लंडनमधील ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’ येथे वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षीची विम्बल्डन टेनिस स्पर्धा २७ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. आजपासून (२१ जून) या स्पर्धेची पात्रता फेरी खेळवली जात आहे. भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन हे पात्रता फेरीतूनच बाहेर पडले आहेत. आज झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात भांबरी आणि रामनाथन यांना पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही खेळाडूंनी आपले सामने सरळ सेटमध्ये गमावले. त्यामुळे भारताच्या सर्व आशा आता सानिया मिर्झावर असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात युकी भांबरीचा सामना स्पेनच्या बर्नाब झपाटाशी झाला. या सामन्यात भांबरीला ५-७, १-६ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. युकीने सामन्यात चांगली सुरुवात करत पहिल्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर झपाटाने शानदार पुनरागमन केले. या पराभवासह भांबरी ग्रँड स्लॅमस्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पेनच्या झपाटाने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतदेखील चांगली कामगिरी करत चौथी फेरी गाठली होती.

हेही वाचा – भारतीय वंशाच्या लिसाने रचला इतिहास, एफआयसीएच्या अध्यक्षपदी झाली नियुक्ती

भारताचा दुसरा टेनिसपटू राजकुमार रामनाथनचा सामना झेक प्रजासत्ताकच्या विट कोपारिवाशी झाला होता. तोही सरळ सेटमध्ये ५-७, ४-६ अशा फरकाने पराभूत झाला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडू दडपणाखाली असल्याचे दिसत होते. दोघांनीही खूप चुका केल्या, पण शेवटी कोपारिवाने बाजी मारली.

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी विम्बल्डनमध्ये एटीपी गुण न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे टेनिसपटू रोहन बोपण्णाने यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. अशातच, भारताचे दोन्ही पुरुष टेनिसपटू पात्रता फेरीत पराभूत झाल्यामुळे पुरुष गटात भारताच्या सर्व आशा मावळल्या आहेत.

हेही वाचा – Ranji Trophy 2022 Final : मध्य प्रदेश २३ वर्षांचा दुष्काळ संपवणार की पुन्हा मुंबईच मैदान मारणार?

दरम्यान, भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत पोहचली आहे. या स्पर्धेची मुख्य फेरी गाठणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. ३५ वर्षीय सानियाने तिची झेक जोडीदार लुसी हाराडेकासह मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताच्या सर्व अपेक्षा सानिया मिर्झावर आहेत.