Sachin Tendulkar congratulates on Carlos Alcaraz: स्पेनचा स्टार खेळाडू आणि टेनिस क्रमवारीत सध्याचा नंबर १, कार्लोस अल्कराझने रविवारी विम्बल्डन विजेतेपदाच्या लढतीत टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला. यामुळे जोकोव्हिचचे २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. टेनिस हा जगातील सर्वात प्रतिष्ठित खेळांपैकी एक आहे आणि त्याची क्रेझ क्रिकेटपटूंमध्येही आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र व्हायरल होत असलेल्या या सामन्याबाबत सचिन तेंडुलकर आणि अश्विननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटचा देव अशी ख्याती मिळवलेल्या सचिन तेंडुलकर त्याच्या या खेळीचा फॅन झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोकोव्हिचने जरी दमदार सुरुवात केली असली तरी, सात वेळा विम्बल्डन विजेत्याला त्याच्या सर्व्हिसपूर्वी बराच वेळ वाया घालवल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला. त्याने चेंडू वर हवेत सर्व्ह करण्यासाठी फेकला परंतु अनेक प्रसंगी तो सर्व्ह करू शकला नाही, ज्यामुळे काही गुणांच्या फरकाने त्याचा पराभव झाला थेट गुण अल्कराझला मिळाले.

जोकोव्हिचला पेनल्टी मिळाल्याने अश्विनला आनंद झाला

‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, जोकोव्हिचला सर्व्हिस करण्यासाठी ३३ सेकंद लागले, दुसरीकडे अल्काराजला २७ सेकंद लागले. दुसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये जोकोव्हिचला यामुळे अखेरीस टाईम पेनल्टी देण्यात आली. या घटनेचा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या निर्णयाचा आनंद केवळ प्रेक्षकांनीच साजरा केला नाही तर सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये असलेला फिरकीपटू आर. अश्विननेही सोशल मीडियावर या निर्णयाचा आनंद साजरा केला. त्याने “वेळेचे उल्लंघन” असे ट्वीट केले आणि नंतर दोन टाळ्या वाजवणारे इमोजी पोस्ट करत जोकोव्हिचची मजा घेतली.

सचिन तेंडुलकरने जोकोव्हिचच्या संयमाचे कौतुक केले

दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने जोकोव्हिचच्या मानसिक कणखरतेचे कौतुक केले. दुसरा आणि तिसरा सेट गमावल्यानंतर जोकोव्हिचने पुनरागमनाची चिन्हे दाखवली आणि चौथा सेट जिंकून सामना पाचव्या सेटमध्ये नेला आणि तिथेच सामना निर्णायक ठरला.

मी अल्कराझला १०-१२ वर्षे फॉलो करेन – सचिन तेंडुलकर

सामना संपल्यानंतर लगेचच, तेंडुलकरने आणखी एक ट्वीट पोस्ट केले ज्यात अल्कराझच्या अंतिम फेरीतील शानदार कामगिरीचे कौतुक केले. तेही २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्याविरुद्ध त्याने जी खेळी केली त्याचा मास्टर-ब्लास्टर फॅन झाला आहे. सामन्याबद्दल आपले विचार व्यक्त करताना, सचिनने अल्कराझवर स्तुतीसुमने उधळली. सचिनने टेनिस आयकॉन रॉजर फेडररची आठवण काढली. सचिनने ट्वीटमध्ये म्हटले की, “एवढा अप्रतिम फायनल सामना पाहायला मिळाला! या दोन्ही खेळाडूंचे खेळी पाहून मी भारावून गेलो. दोन्ही खेळाडूंनी अतिशय शानदार खेळ केला. फायनल पाहायला खरंच खूप मजा आली. आपण आजच्या सामन्यात टेनिसमधील एका नव्या ताऱ्याचा उदय पाहिलाय. ज्याप्रमाणे मी रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील प्रत्येक सामना न चुकता पाहिलाय, तसंच आता मी पुढची १०-१२ वर्षे अल्कराझच्या कारकिर्दीतील सामने नक्की पाहीन. कार्लोस अल्कराझ, तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकात भारत-पाकिस्तान दोन वेळा भिडणार, कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या

अल्कराजझचे दुसरे ग्रँडस्लॅम

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्कराझने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोव्हिचची सलग ३४ विजयांची मालिकाही खंडित केली. चॅम्पियनशिपमध्ये फक्त १२ वा सामना खेळणाऱ्या स्पॅनिश तरुण अल्कराझचे हे पहिले विम्बल्डन विजेतेपद होते. टेनिसमधील हे त्याचे दुसरे ग्रँडस्लॅम आहे, त्याने गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon 2023 god of cricket sachin tendulkar congratulates carlos alcaraz ashwin has fun for djokovic avw