Alcaraz on Djokovic, Wimbledon 2023: युवा कार्लोस अल्कराझने विम्बल्डनमध्ये स्पेनच्या जोकोव्हिचचा विजय रोखत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अल्कराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला विम्बल्डन फायनलमध्ये कडवी झुंज दिली. नोव्हाक जोकोव्हिचने सुमारे १८ वर्षांपूर्वी जेव्हा विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीचा पहिला अंतिम सामना खेळला तेव्हा कार्लोस अल्कराझ फक्त दोन वर्षांचा होता. सर्बियन दिग्गज नोव्हाक, चार वेळचा गतविजेता, त्याच्या एकूण आठव्या एकेरी विजेतेपदासाठी ऑल इंग्लंड क्लबच्या आयकॉनिक सेंटर कोर्टवर गेला. त्याचा सामना दिग्गज राफेल नदालच्या देशाचा उदयोन्मुख स्टार अल्कराझशी होता. कार्लोसने जोकोव्हिचला त्याच्या दमदार सर्व्हिसने आणि शानदार खेळाच्या जोरावर आणखी एक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्यापासून रोखले. पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत कार्लोसने विम्बल्डनवर आपले पहिल्यांदाच नाव कोरले.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अल्कराझने २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचवर १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा अप्रतिम विजय साकारताना कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. तब्बल ४ तास आणि ४२ मिनिटे चालणाऱ्या लढतीत दोघांनी अप्रतिम खेळीचे प्रदर्शन केले. गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते. मात्र, त्यानंतरही त्याने जोकोव्हिचला नमवणे हा धक्कादायक निकाल मानला जात आहे.
माझा जन्म होण्यापूर्वीच तू विम्बल्डनमध्ये जिंकत होतास- कार्लोस अल्कराझ
फायनल जिंकल्यानंतर कार्लोस अल्कराझ म्हणाला, “मी नोव्हाक जोकोव्हिचला पाहून टेनिस खेळायला सुरुवात केली. माझ्या जन्माआधीपासून तू स्पर्धा जिंकत आला आहेस. ही अद्भुत, अविश्वसनीय अशी कामगिरी तू आधीच करून आहे. तुझ्याकडे बघून आज मी इथेपर्यंत पोहचलो आणि आज तुलाच हरवले. हा माझ्यासाठी खूप भावूक क्षण आहे.” जोकोव्हिचच्या वयाचा उल्लेख करताच संपूर्ण स्टेडियममध्ये एकच हशा पिकला, खुद्द जोकोव्हिचलाही हसू अनावर झाले.
एकूण २१९५ दिवसांनी विजयी रथ थांबला
जोकोव्हिचला २०१७च्या विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत टॉमस बर्डिचकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २१९५ दिवस तो येथे अपराजित राहिला. जोकोव्हिचने पहिला सेट केवळ ३४ मिनिटांत ६-१ असा जिंकला. अनुभवी नोव्हाकने फोरहँड स्मॅशच्या जोरावर पहिला गेम आपल्या नावे केला आणि त्याला येथे आपले विजेतेपद टिकवून ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही असे दिसत होते.
रोमांचक दुसरा सेट
अल्कराझने दुसऱ्या सेटमध्ये दोनदा सर्व्हिस ब्रेक केली. सेटचा पाचवा गेम २६ मिनिटे चालला ज्यामध्ये अल्कराझने जोकोव्हिचची सर्व्हिस ब्रेक करत वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. कार्लोसने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. यासह त्याने सलग १५ ग्रँडस्लॅम टायब्रेकर जिंकण्याचा नोव्हाकचा विक्रमही मोडला.
…आणि विजयाचा रथ रोखला
कार्लोसने तिसरा सेट ६-१ ने जिंकला आणि चौथ्या सेटमध्ये ६-३ने विजय मिळवला. पाच सेटच्या सामन्यात त्याचा स्कोअर ८-१ असा होता. ३६ वर्षीय जोकोव्हिचने अनुभव आणि तग धरण्याच्या जोरावर पाचवा सेट लांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार्लोसचे क्रॉस कोर्ट आणि पासिंग शॉट्स अप्रतिम होते. त्याच पासिंग शॉटने जोकोव्हिचचा विजय रथ अल्कराझने रोखला.
रॅकेटवर राग
पाचव्या आणि निर्णायक सेटच्या तिसऱ्या गेममध्ये अल्कराझने जोकोव्हिचे आव्हान मोडून काढले त्यावेळी सर्बियन दिग्गजाने आपला संयम गमावला. तो नेटजवळ गेला आणि त्याने त्याचे रॅकेट पोस्टवर आदळले. यामुळे त्याच्या रॅकेटचा आकार बिघडला. यासाठी अंपायरने त्याला नियमानुसार ताकीदही दिली.