टेनिस जगतातील मानाच्या विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच शुक्रवारी विवाहबद्ध झाला.
ग्रँड स्लॅमची सप्तपदी!
नोव्हाकने त्याची प्रेयसी जेलेना रिस्टिक हिच्याशी विवाह केला. माँटेनिग्रो येथे एका छोटेखानी रिसॉर्टमध्ये विवाह समारंभ झाला. यावेळी दोघांचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि काही मोजके पाहुणे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, तेथील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या विवाह समारंभाबाबत
कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. रिसॉर्टमधील कर्मचाऱयांना गुप्ततेच्या करारावर सही करण्यास सांगण्यात आले होते. तसेच समारंभादरम्यान कर्मचाऱयांना मोबाईल फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
गेल्या आठ वर्षांपासून नोव्हाक आणि रिस्टिक एकत्र आहेत. रिस्टिक ही गर्भवती आहे.
मागील रविवारी रॉजर फेडररवर मात करून विम्बल्डनवर नाव कोरणाऱया नोव्हाकने आपला विजय रिस्टिक व होणाऱया बाळास समर्पित केला होता.

Story img Loader