जेतेपदापर्यंतची वाट किती खडतर होऊ शकते याचा प्रत्यय बुधवारी विम्बल्डन स्पर्धेत इंग्लंडच्या अँडी मरेला आला. थरारक लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ४-६, ३-६, ६-१, ६-४, ७-५ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या लढतीत अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने स्पेनच्या डेव्हिड फेररला चीतपट करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. जोकोव्हिचने बर्डीचचे आव्हान ७-६ (५), ६-४, ६-३ असे संपुष्टात आणत सलग १३व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत धडक मारली. दुखापतीवर मात करत डेल पोट्रोने फेररला ६-२, ६-४, ७-६ (७-५) असे नमवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in