विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचनं शापोवालोव्हचा पराभव केला. शापोवालोव्हला 7(7)-6(3), 7-5, 7-5 नं पराभूत केलं. जोकोव्हिच सातव्यांदा विम्बलडनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता अंतिम फेरीत जोकोव्हिचची लढत इटलीच्या मटेओ बेरेटिनी विरुद्ध असणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण बाजी मारत याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

उपांत्य फेरीत सातव्या मानांकित मटेओ बेरेटिनीनं हुबार्ट हुर्काझ याचा ६-३, ६-०, ६-७, ६-४ ने पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. विम्बलडनची अंतिम फेरी गाठणारा तो इटलीचा पहिला टेनिसपटू आहे. बेरेटिनीनं पहिल्यांदाज ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

हुर्काझनं उपांत्यपूर्व सामन्यात १४व्या मानांकित हुर्काझने फेडररवर अवघ्या १ तास आणि ४९ मिनिटांत ६-३, ७-६ (७-४), ६-० असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे फेडररचे २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. मात्र उपांत्य फेरीत त्याला बेरेटिनीकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

Story img Loader