महिलांत श्वीऑनटेक, स्विटोलिना, कीजची आगेकूच

विम्बल्डन : सर्बियाचा दुसरा मानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक, बिगरमानांकित युक्रेनची एलिना स्विटोलिना आणि अमेरिकेची मॅडिसन कीजनेही उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचने पोलंडच्या हबर्ट हुरकाझचा संघर्ष ७-६ (८-६), ७-६ (८-६), ५-७, ६-४ असा मोडून काढला. सामन्यातील पहिले दोन सेट जोकोव्हिचने जिंकत आघाडी घेतली. मात्र, हे दोन्ही सेट जिंकताना त्याला हुरकाझने झुंजवले. तिसरा सेट हुरकाझने जिंकत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने त्याला संधी न देता सेटसह सामना जिंकला. अन्य, उपउपांत्यपूर्व सामन्यात मेदवेदेवला पुढील फेरीत चाल मिळाली.

महिलांमध्ये श्वीऑनटेकने बेलिंडा बेंचिचला ६-७ (४-७), ७-६ (७-२), ६-३ असे पराभूत केले. तर, स्विटोलिनाने व्हिक्टोरिया अझारेन्काचा २-६, ६-४, ७-६ (११-९) असा पराभव केला. अन्य सामन्यात, कीजने मिरा अँड्रिवावर ३-६, ७-६ (७-४), ६-२ असा विजय मिळवला.