विम्बल्डन : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला आणि सात वेळचा विल्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला यंदाच्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या आंद्रे रुब्लेव्हला सामोरे जावे लागू शकेल.प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
क्वीन्स ब्लब स्पर्धेत जेतेपद मिळवून जागतिक क्रमवारीत पुन्हा अग्रस्थान मिळवणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित होल्गर रुनशी सामना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिच आणि अल्कराझ एकमेकांविरुद्ध खेळले होते. मात्र, विम्बल्डनमध्ये हे दोन आघाडीचे खेळाडू अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळू शकतील. यंदाच्या स्पर्धेत अल्कराझला अग्रमानांकन मिळाले असले, तरी जोकोव्हिच या स्पर्धेत गतविजेता म्हणून खेळेल.