रितूषा आर्या या युवा हॉकीपटूची तिची सहकारी राणी रामपाल हिने मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. ‘‘रितूषा सध्या तुफान फॉर्मात असून आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत ती प्रतिस्पध्र्यासाठी धोकादायक ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या मलेशिया दौऱ्यात रितूषाने चमकदार कामगिरी केली होती. अवघे १५ सामने खेळलेली रितूषा प्रतिस्पध्र्याच्या बचावफळीसाठी धोकादायक ठरमार आहे,’’ असे राणीने सांगितले. ती म्हणाली, ‘‘ग्लास्गोत सराव केल्यानंतर रितूषा चांगल्या फॉर्मात दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यापासून तिच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक कामगिरी साकारून पदक मिळवेल, अशी मला खात्री आहे.’’ राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना कॅनडाविरुद्ध २४ जुलैला होणार आहे.

Story img Loader