तामिळनाडू राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने सुरू असलेल्या ३९व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी घोडदौड कायम राखली आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी बाद फेरी गाठली आहे. मुलींच्या संघाने गोव्याला ६९-२६ असे पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी आंध्र प्रदेशला २८-६ असे सहज हरवले.
कुमार गटात, महाराष्ट्राच्या मुलांनी हैदराबादला २०-९ असे पराभूत करत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना छत्तीसगढशी होणार आहे. विदर्भच्या मुलींनी मणिपूरचा ३२-३१ असा निसटता पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली.