तंत्रज्ञानाच्या अद्भुत अदाकारीने कारवर अचूक नियंत्रण राखून वेगावर स्वार होत सर्वाना वेगाची अनुभूती देणारा फॉम्र्युला-वनमधील रेड बुल संघाचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलने फॉम्र्युला-वनमधील क्रमवारीपेक्षा स्पर्धा जिंकणे हे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत वेटेलला सलग चौथे विश्वविजेतेपद खुणावत आहे. वेटेलसाठी चौथे विश्वविजेतेपद पटकावण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. तो योग सुदैवाने भारतातच जुळून येणार आहे. मायकेल शूमाकर (सात जेतेपदे) आणि जुआन मॅन्युएल फँगियो (पाच जेतेपदे) या महान ड्रायव्हर्सच्या पंक्तीत वेटेल स्थान मिळवणार आहे. जर्मनीने जगाला दिग्गज फॉम्र्युला-वन ड्रायव्हर्सची फौज दिली आहे. त्यापैकीच शूमाकर आणि वेटेल हे दोन रथी-महारथी. शूमाकर यांच्याकडूनच मार्गदर्शनाचे धडे घेणाऱ्या वेटेलने आपल्या वेगाने गेल्या चार मोसमांवर वर्चस्व गाजवले आहे.

Story img Loader