नव महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे महाल येथील चिटणीस पार्क (रा.प. समर्थ स्टेडियम) येथे आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात तुळजाई क्रीडा मंडळ, परतवाडा तर महिलांमध्ये जयिहद क्रीडा मंडळ, यवतमाळ व विदर्भ युथ क्रीडा मंडळ, काटोलने विजयी सलामी दिली. या स्पध्रेसोबत आयोजित सबज्युनिअर गटाच्या जिल्हास्तरीय स्पध्रेत मुलांच्या गटात युवक क्रीडा मंडळाने विजयी सुरुवात केली.
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या तुळजाई परतवाडाने राजापेठ स्पोìटग अमरावतीचा एक डाव तीन गुणांनी पराभव केला. परतवाडाकडून नितेश परडेने ३ मिनिटे ५० सेकंद, तर मनोज गोटेकरने २ मिनिटे पळतीचा खेळ केला. महिलांत जयिहद क्रीडा मंडळाने न्यू इग्लिश हायस्कूलचा एक डाव ११ गुणांनी धुव्वा उडविला. जयिहदकडून स्विटी झेंडेकरने ३ मिनिटे २० सेकंद, पायल जाधवने २ मिनिटे ५० सेकंद पळतीचा खेळ केला. नीलम राऊतने चार गडी बाद केले.
विदर्भ युथ काटोलने तुळजाई परतवाडाला एक डाव दोन गुणांनी लीलया नमविले. सबज्युनिअर मुलांमध्ये युवक क्रीडा मंडळाने महाराष्ट्र क्रीडा मंडळाला एक डाव ४ गडय़ांनी नमविले. अनिकेत लाडघरेने पहिल्या डावात एक मिनिट ४० सेकंद, तर दुसऱ्या डावात ३ मिनिटे १० सेकंद खेळ केला.
महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन झाले. त्यांनी मदानाची पूजा करून स्पध्रेचे उद्घाटन केले. यंदाही महानगरपालिका महापौर करंडक खो-खो स्पध्रेचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. नगरसेवक संदीप जोशी, चिचुभाऊ मंग्रुळकर, भाऊ काणे, जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव सुधीर िनबाळकर या वेळी उपस्थित होते. प्रा. धनंजय काणे यांनी प्रास्ताविक केले. विशाखा जोशी यांनी संचालन केले. शुभांगी लाबडेने आभार मानले.