आठवडय़ाची मुलाखत : अवधूत तावडे, हिवाळी क्रीडापटू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या देशात हिवाळी क्रीडा प्रकारांकरिता विपुल नैपुण्य आहे. मात्र केवळ औपचारिकतेने त्याकडे न पाहता योग्य दूरदृष्टी ठेवत संघटकांनी प्रयत्न केले पाहिजे, तरच आपले खेळाडू हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळवू शकतील, असे मत माजी आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडापटू अवधूत तावडे यांनी व्यक्त केले आहे.

तावडे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धामध्ये भरघोस यश मिळवले आहे. तसेच त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. प्याँगचाँग येथे आयोजित केलेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे केवळ दोनच खेळाडू सहभागी झाले होते. आजपर्यंत या स्पर्धामध्ये भारताचा सहभाग नगण्यच राहिला आहे. हिवाळी ऑलिम्पिकबाबत दिसून येणाऱ्या उदासीनतेबाबत तावडे यांच्याशी केलेली खास बातचीत-

* हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता भारतातील खेळाडूंकडे आहे काय?

हो, निश्चितच. या खेळात हौसेखातर सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या भरपूर आहे. या खेळासाठी भरपूर नैपुण्य उपलब्ध आहे. मात्र अर्थार्जनाच्या अभावी अनेक खेळाडू अन्य उद्योगात किंवा नोकरीत सहभागी होतात व त्यांचे खेळाडू होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना तहहयात चांगली शिष्यवृत्ती दिली जाते. साहजिकच त्या देशातील प्रत्येक खेळाडू अशा स्पर्धामध्ये पदक मिळवण्याच्या ईर्षेने कष्ट करतो. तशी आर्थिक हमी आपल्या खेळाडूंना मिळाली तर आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल व ते निश्चित मनाने खेळाडूची कारकीर्द घडवू शकतील.

* संघटनात्मक स्तरावर काय प्रयत्नांची आवश्यकता आहे?

आपण कशासाठी या खेळात आहोत, त्याचा फायदा मला जीवनात कसा होणार आहे. याची जाणीव खेळाडूंमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी संघटनेने उचलली पाहिजे. फक्त सध्याच्याच पिढीचा ते विचार करतात. पुढच्या पिढय़ांना या खेळाचा कसा फायदा हाईल. नवोदित खेळाडूंना या खेळासाठी कसे आकर्षित केले जाईल, याचा विचार संघटकांनी केला पाहिजे. केवळ संघटना सुरू ठेवण्यातच त्यांना स्वारस्य वाटत असते. हिवाळी क्रीडा प्रकारांपैकी अनेक खेळांच्या सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र त्याचा स्पर्धात्मक फायदा कसा घेतला जाईल व त्यामधून उत्तम खेळाडू कसे घडतील, याचा विचार करण्याची गरज आहे.

* राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी येत असतात ?

हिवाळी ऑलिम्पिकपैकी स्कीइंग, शॉर्ट ट्रॅक, स्पीड, स्लालोम, आईसहॉकी, फिगर स्केटिंग आदी काही प्रकारांच्या स्पर्धा आपल्याकडे अनेक ठिकाणी घेतल्या जातात. मात्र अशा स्पर्धाच्या वेळी गुणवत्ता शोधाबाबत गांभीर्याने विचार होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साधनांचा त्यामध्ये अभाव असतो. जागतिक दर्जाच्या सुविधा व साधने असली तर येथे परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण देता येईल. या स्पर्धाच्या वेळी वैद्यकीय सेवा केवळ नावापुरतीच असते. बर्फावरील स्पर्धाच्या वेळी अनेक वेळा अनिश्चित हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असते. खरे तर स्केटिंग व अन्य काही प्रकारात खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र त्यादृष्टीने गंभीरतेने पाहिले जात नाही. अलीकडे जंगलतोडीचा अनिष्ट परिणाम या खेळावर होत आहे.

* हिवाळी क्रीडा प्रकार खूप खर्चीक असतात. त्याबद्दल काय सांगता येईल?

होय, हा खेळ खर्चीक आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी असते याची जाणीव संघटकांनी ठेवली पाहिजे. खेळाडूंना स्पर्धेतून आर्थिक फायदा होईल यावर भर दिला पाहिजे. अन्य क्रीडा प्रकारांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या किंवा अन्य खेळाडूंना ज्याप्रमाणे चांगल्या हुद्दय़ांवर व गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात, तशा नोकऱ्या हिवाळी क्रीडापटूंनाही देण्याची गरज आहे. जागतिक दर्जाची साधने सवलतीच्या दरात खेळाडूंना मिळण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी या खेळाची लोकप्रियता आहे, त्या ठिकाणी पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित केल्यास एकाच वेळी खेळाडू व भरपूर पर्यटक येतील. सौंदर्यस्थळ म्हणूनही त्याचा विचार होईल. अन्य खेळांप्रमाणेच या खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्यांची समाज माध्यमांद्वारे यशोगाथा सर्वदूर पसरली गेली तर आपोआपच या खेळासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल.