भारतीय संघाने वर्षाची शेवट दमदार मालिका विजयाने केली. वेस्ट इंडिजविरूद्धच्या शेवटच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ४ गडी राखून धूळ चारली. या विजयासह भारताने २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकाचा (२०१०-२०१९) शेवट गोड केला. गेल्या काही वर्षात भारतीय संघाची भरभराट झाली. २०११ च्या विश्वचषक विजयापासून ते २०१९ च्या शेवटच्या मालिका विजयापर्यंत टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. मात्र प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘विस्डन’च्या ‘दशकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटपटूं’च्या यादीत केवळ २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

“हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”

११ खेळाडूंच्या या यादीत सर्वाधिक म्हणजेच ३ खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. सलामीवीर फिंचसह शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्या पाठोपाठ भारत, अफगाणिस्तान यांचे २-२ खेळाडू आहेत. तर श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या केवळ एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे.

धोनीची टिंगल करणारा शोएब मलिक तुफान ट्रोल

२०१०-२०१९ या दशकात एकूण ८९७ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले गेले. त्यात २ लाख ४९ हजार ५७८ धावा करण्यात आल्या, तर ११ हजार २९३ बळी टिपले गेले. लॉरेन्स बूथ, जो हार्मन, फिल वॉकर आणि यास राना या चार सदस्यांच्या समितीने या ११ क्रिकेटपटूंची निवड केली आहे.

Video : ‘एकहाती कॅच’… स्मिथला बाद करण्यासाठी निकल्सने टिपला भन्नाट झेल

दशकातील सर्वोत्तम टी २० क्रिकेटपटूंचा संघ –

१. अ‍ॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)
२. कॉलिन मुनरो (न्यूझीलंड)
३. विराट कोहली (भारत)
४. शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
५. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
६. जोस बटलर (इंग्लंड)
७. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)
८. डेव्हिड विली (दक्षिण आफ्रिका)
९. रशिद खान (अफगाणिस्तान)
१०. जसप्रीत बुमराह (भारत)
११. लसीथ मलिंगा (श्रीलंका)

“भारतावर बहिष्कार घाला”; जावेद मियाँदाद बरळला…

विराट कोहलीला या संघात स्थान देण्यात आले असले, तरी त्याला कर्णधार म्हणून संघात स्थान मिळालेले नाही. कर्णधारपदाची धुरा अ‍ॅरोन फिंचच्या खांद्यावर देण्यात आली आहे, तर यष्टीरक्षक म्हणून जोस बटलरच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

Story img Loader