वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीसाठी शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला विस्डनच्या सध्याच्या पर्वातील ऑल फॉर्मेट प्लेइंग इलेवनचा कर्णधार बनवलं गेलं आहे. विस्डनने तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा एक संघ बनवला आहे. त्याचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० सामन्यात खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत. या तिन्ही फॉर्मेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या खेळाडूंची यात निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा दिसत आहे. टीम इंडियाच्या ४ खेळाडूंचा यात समावेश आहे. विस्डनच्या ऑल फॉर्मेट संघात भारताचे ४, इंग्लंडचे ३, न्यूझीलंडचे २, ऑस्ट्रलिया आणि आफगाणिस्तान संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. या संघात पाकिस्तानच्या एकही खेळाडूला स्थान मिळालेलं नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा