गेली दोन दशके जगभरातील टेनिस रसिकांवर गारुड करणाऱ्या ४१ वर्षीय रॉजर फेडरर गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. आपण स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होणार असून ‘‘पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असेल,’’ असे फेडररने जाहीर केलं आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा संपल्यानंतर चार दिवसांतच स्वित्झर्लंडच्या या खेळाडून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर समाज माध्यमांवर फेडरर विषयी अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. विशेष म्हणजे फेडररचा कट्टर प्रतीस्पर्धी असणारा राफेल नदालही या घोषणेमुळे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

नदालने दोन ट्वीट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. नदालने पहिल्या ट्वीटमध्ये फेडररबरोबर कोर्ट शेअर करता आला हीच माझ्यासाठी फार सन्मानची बाब असल्याचं म्हटलं आहे. “प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी. हा दिवस कधीच येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी आणि जगभरातील खेळांसाठी हा दु:खद दिवस आहे. टेनिस कोर्ट तुझ्याबरोबर शेअर करणे ही माझ्यासाठी फार सन्मानची गोष्ट होती. तुझ्याविरोधात इतकी वर्ष खेळता आलं हे आनंददायी बाब आहे. टेनिक कोर्टबरोबरच या कोर्टच्याबाहेर असे अनेक आश्चर्यकारक क्षण आपण एकत्र जगलो,” असं नदाल म्हणाला.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

पुढच्या ट्वीटमध्ये नदालने भविष्यातही आपण अनेक गोष्टींचा एकत्र आनंद घेऊ असं सांगतानाच कौटुंबिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “भविष्यात आपण अनेक असे क्षण एकत्र साजरे करु. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र सध्या मी तुला तुझी पत्नी म्रिका, मुलांबरोबर कुटुंबाला सर्व सुख मिळो अशाच शुभेच्छा देतो. तुमच्या पुढील भविष्यासाठी फार फार शुभेच्छा. लंडनमधील लेव्हर चषक स्पर्धेत भेटूच,” असं ट्वीट नदालने केलं आहे.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरुन फेडररचा फोटो शेअर करत त्याला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. “अद्भुत कारकीर्द. आम्ही तुझ्या टेनिसच्या ‘ब्रँड’च्या प्रेमात पडलो. तुझ्यामुळे आम्हाला हळूहळू टेनिसची सवय झाली आणि सवयी कधीच निवृत्त होत नाहीत, त्या आपलाच एक भाग बनतात. तू दिलेल्या सर्व अविस्मरणीय आठवणींबद्दल धन्यवाद!” असं सचिनने म्हटलं आहे.

आपल्या नजाकतदार खेळाने, लोभस व्यक्तिमत्त्वाने, असीम ऊर्जा आणि थक्क करणाऱ्या तंदुरुस्ती टेनिसच्या कोर्टशिवाय या कोर्टाबाहेरही फेडररने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळेच फेडररच्या निवृत्तीच्या वृत्तावर अगदी त्याच्या विरोधकांपासून स्वत: दैदिप्यमान कारकिर्द असणाऱ्या अनेक बड्या खेळाडूंनीही हळहळ व्यक्त केल्याचं दिसत आहे. फेडरर यापुढे कोर्टवर दिसणार नाही हे त्याच्या सेलिब्रिटी चाहत्यांनाही मान्य करणं कठीण जात आहे.