आपल्या फटकेबाजीने समोरच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करणाऱ्या क्रिकेटच्या देवाने आज ४५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तब्बल २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा मराठमोळ सचिन तेंडुलकर हा संपूर्ण जगासाठी एक आयकॉन बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिनच्या चाहत्या वर्गात सतत वाढ होतानाच दिसते आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन-डे आणि कसोटी सामन्यांत मिळून १०० शतकं, वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम द्विशतक करणारा खेळाडू यासारखे अनेक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज संपूर्ण जगभरातून सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. आपल्या खास मित्रांसाठी आणि परिवारातल्या सदस्यांसाठी सचिनने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. याचसोबत सचिनसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या देवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये सचिनसोबत सलामीला येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या विरेंद्र सेहवागसह, माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.