अन्वय सावंत

मुंबई : भारताचे २०११ सालचे विश्वविजेतेपद..धोनीचा तो षटकार..सचिनला संघ-सहकाऱ्यांनी उचलून मैदानावर मारलेली फेरी या सर्व आठवणी आज, गुरुवारी ताज्या होणार आहेत. याचे कारण म्हणजे, २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीची आज पुनरावृत्ती होणार असून भारत आणि श्रीलंका हे संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

१२ वर्षांपूर्वी वानखेडेवरच झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेकडून महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर श्रीलंका क्रिकेटचा स्तर ढासळला असून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी सहापैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान शाबूत राखण्यासाठी श्रीलंकेला विजय महत्त्वाचा आहे. त्यांना गेल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा >>>NZ vs SA, World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला केले चारीमुंड्या चीत, तब्बल १९० धावांनी केला दारूण पराभव

दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवताना सहापैकी सहा सामने जिंकले आहे. भारताने पहिले पाच विजय हे धावांचा पाठलाग करताना मिळवले होते. मात्र, गेल्या सामन्यात लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताला ५० षटकांत २२९ धावांचीच मजल मारता आली होती. मात्र, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यांच्यासह सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा केला आणि गतविजेत्या इंग्लंडला केवळ १२९ धावांत गुंडाळत भारताला सलग सहावा विजय मिळवून दिला. आता श्रीलंकेला नमवण्यात यश आल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. वानखेडेवर यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अनुक्रमे ३९९ व ३८२ धावांची मजल मारली होती. त्यामुळे या लढतीत भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास पुन्हा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.

हेही वाचा >>>IND vs SL: वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबईकरांच्या कामगिरीवर नजर

  • ’ भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. घरच्या मैदानावर हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वाचे लक्ष असेल.
  • ’  श्रेयस अय्यरच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. यंदाच्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याला केवळ एक अर्धशतक करता आले आहे. विशेषत: उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध तो अडखळताना दिसला आहे.
  • ’ आपला आदर्श सचिन तेंडुलकरच्या ज्या मैदानावर पुतळा उभारण्यात आला, त्याच मैदानावर सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी विराट कोहली उत्सुक असेल.

श्रीलंकेची भिस्त मेंडिस, समरविक्रमावर

  • ’ श्रीलंकेला भारतीय संघाचा विजयरथ रोखायचा झाल्यास कर्णधार कुसाल मेंडिस, सदीरा समरविक्रमा आणि पथुम निसांका यांसारख्या फलंदाजांना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
  • ’ समरविक्रमा आणि निसांका लयीत आहेत. समरविक्रमाने सहा सामन्यांत प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतकासह ३३१ धावा केल्या आहेत. सलामीवीर कुसाल परेराने कामिगरी उंचावणे गरजेचे आहे.
  • ’ अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजची भूमिकाही श्रीलंकेसाठी महत्त्वाची ठरेल. गोलंदाजीत डावखुरा दिलशान मदुशंका वेगवान मारा करून भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकेल अशी श्रीलंकेला आशा असेल.

’ वेळ : दुपारी २ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी,  हॉटस्टार अ‍ॅप

Story img Loader