आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत मारिया रेबेलो पंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. आय-लीगमध्ये पंचाच्या भूमिकेत दिसणारी ती पहिली महिला ठरणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
फुटबॉल संघटनेने २०१३-२४ हंगामासाठीच्या पंचांची निवड केली, ज्यामध्ये मारियाचा समावेश करण्यात आला आहे. आय-लीग पंच नियुक्ती सल्लागार समितीने मारियाच्या नावाची शिफारस केली होती. मारिया गेल्या काही हंगामापासून आय-लीग-२ मध्ये पंच म्हणून कार्यरत आहे. या व्यतिरिक्त गोवा व्यावसायिक लीगमध्येही ती पंचाच्या भूमिकेत होती. भारताची माजी कर्णधार असलेल्या मारियाचा आशिया महासंघ निर्देशित एलिट पंचांच्या यादीत समावेश असून, तिने संतोष करंडकातही पंच म्हणून काम पाहिले आहे. तिच्या कामगिरीची दखल घेत आम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच तिच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिच्या नियुक्तीमुळे महिला पंचांना नवा आत्मविश्वास मिळेल असे उद्गार आय-लीग पंच नियुक्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष गुलाब चौहान यांनी काढले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा