महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा कायम आहे. ऑस्ट्रेलिया संघाने साखळी फेरीतील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच गडी आणि २८ चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने ५० षटकात ५ गडी गमवून २७१ धावा केल्या आणि विजयासाठी २७२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमवत ४५ षटकं आणि २ चेंडूत पूर्ण केलं. दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.
दक्षिण अफ्रिकेचा डाव
दक्षिण अफ्रिकेला लिझले ली आणि लॉरा वॉलवार्ड्ट या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी ८८ धावांची भागीदारी केली. मात्र ३६ या वैयक्तिक धावसंख्येवर असताना ली पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर लारा गुडालही जास्त काळ तग धरू शकली नाही. १५ धावांवर असताना अनाबेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. ली आमि सुने ल्यूस या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. दोघांनी अर्धशतकं झळकावली. ली हीने १३४ चेंडूत ९० धावा तर ल्यूसने ५१ चेंडूत ५२ धावा करून बाद झाली. त्यानंतर मिगऩन ड्युप्रीजही १४ धावा करून तंबूत परतली. मॅरिझेन कॅप्प (३०) आणि क्लोइ ट्रायन (१७) धावांवर बाद राहिली.
ऑस्ट्रेलियाचा डाव
दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सलामीची फलंदाज झटपट बाद झाले. रेशल हेनस (१७) आणि अलिसा हीली (५) धावा करून बाद झाले. मात्र मेग लन्निंग हीने संघाचा डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी चांगली भागीदारी केली. मेग लन्निंगने १३० चेंडूत १३५ धावा करून नाबाद राहीली. तिला बेथ मूने (२१), तहिला मॅकग्राथ (३२), एशले गार्डनर (२२) आणि अनाबेल सथरलँड (२२*) यांची मोलाची साथ मिळाली.
दक्षिण अफ्रिका: लिझले ली, लॉरा वॉलवार्ड्ट, लारा गुडाल, सुन ल्यूस, मिगनॉन ड्युप्रीज, मरीझेन कॅप्प, क्लोइ ट्रायन, त्रिशा चेट्फी, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, टुमी सेखुखुने
ऑस्ट्रेलिया: रेशल हेनस, अलिसा हीली, मेग लन्निंग, बेथ मूने, तहिला मॅकग्राथ, एखले गार्डनर, अनाबेल सथरलँड, इलिसे पेरी, जेस जॉनासेन, एलाना किंग, मेगन स्कूट