महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील फायनल सामना आज (२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसहाला बफेलो पार्क इस्ट लंडन येथे सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एका सदस्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू एका दक्षिण चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसत आहेत. जो व्हायरल होत आहे. जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेहा राणा आणि सुषमा वर्मा यांच्यासोबत, राजेश्वरी गायकवाड ड्रेसिंग रूममध्ये डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
या तिरंगी मालिकेत भारताचा शानदार प्रवास राहिला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २७ धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ५६ धावांनी पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना निकालाविना राहिला. त्याचवेळी, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पुन्हा पराभव केला.
हेही वाचा – IND vs NZ 3rd T20: शुबमन गिलचा एक डाव ‘धोबीपछाड’ सुरेश रैनासह रोहित-विराटसारख्या दिग्गजांना टाकले मागे
या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे महिला संघ २ फेब्रुवारीला आमनेसामने असतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेत आतापर्यंत अजिंक्य ठरली आहे. आता अंतिम सामन्यात भारतीय संघ या मालिकेवर कब्जा करू शकणार की नाही हे पाहावे लागेल.
भारतीय महिला संघ: स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, सुषमा वर्मा, स्नेह राणा, सभिनेनी मेघना, मेघना सिंग, राधा यादव, अंजली सरवानी आणि अमनजोत कौर