अर्जेन्टिनाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपदी रितू राणी हिचीच निवड करण्यात आली आहे. १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा दौरा होणार आहे.
राष्ट्रीय शिबिरातील कामगिरीच्या आधारे अठरा खेळाडूंचा हा संघ निवडण्यात आला असून उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपिकाकुमारी हिच्याकडे देण्यात आली आहे. भारतीय संघाने यंदा चांगले यश मिळविले असून त्यांनी ३६ वर्षांनंतर ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले, संघातील खेळाडू काही महिने एकत्रित सराव करीत असल्यामुळे त्यांच्यातील समन्वय वाढला आहे. सरावातही आम्ही सांघिक कौशल्यावर भर दिला आहे. अर्जेन्टिनाच्या दौऱ्यात आमचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करील अशी मला खात्री आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफचेही अतिशय चांगले सहकार्य मिळत आहे. संघाने ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केल्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसारखे वातावरण अर्जेन्टिनात असल्यामुळे आमच्या खेळाडूंना या दौऱ्याचा खूप फायदा होणार आहे.

भारतीय संघ
गोलरक्षक-सविताकुमारी, रजनी एटिमारपु. बचावरक्षक-सुनीता लाक्रा, दीपिकाकुमारी (उपकर्णधार), सुशीला चानू, जसप्रीत कौर, दीप ग्रेस एक्का. मध्यरक्षक-रेणुका यादव, रितू राणी (कर्णधार), लिलिमा मिंझ, नवज्योत कौर, मोनिकाकुमारी, नमिता टोप्पो. आघाडी फळी-नवनीत कौर, राणीकुमारी, पूनम राणी, वंदना कटारिया, अनुराधा देवी थोकचोम.

Story img Loader