Women’s Premier League 2024 Full Schedule : महिला प्रीमियर लीग २०२४ या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे, ज्यामध्ये गतवर्षीच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर उद्घाटनाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. पहिला सामना २३ फेब्रुवारीला होईल, तर अंतिम सामना १७ मार्चला दिल्लीत होईल.
यंदा महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण २२ सामने होणार आहेत. अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील. १५ मार्च रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाईल.
गेल्या हंगामाप्रमाणे, यंदा महिला प्रीमियर लीगमध्ये होम-अवे फॉरमॅट नसेल. मात्र, यंदा ही स्पर्धा दिल्ली आणि बंगळुरू या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. डब्ल्यूपीएल २०२४ चा हंगाम गेल्या वर्षीच्या फॉरमॅटसारखाच असेल. यामध्ये साखळी फेरीतील अव्वल ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. गुणतालिकेत अव्वल असणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ १५ मार्चला एलिमिनेटर सामना खेळतील.
हेही वाचा – Virat Kohli : अयोध्येत दिसला किंग कोहलीचा डुप्लिकेट, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड; पाहा VIDEO
मागील हंगामात हरमनप्रीत कौरचा संघ चॅम्पियन ठरला –
गेल्या वर्षीच्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पटकावले. त्यांनी अंतिम सामन्या दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेट्सनी पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले. मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ३४५ धावा केल्या होत्या, तर मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजने १० सामन्यांत १६ बळी घेत पर्पल कॅप जिंकली होती.
हेही वाचा – BCCI : रिंकू सिंगचे पुन्हा चमकले नशीब, आता त्याला पांढऱ्या जर्सीत आपली जादू दाखवण्याची मिळाली संधी
डब्ल्यूपीएल २०२४ चे संपूर्ण वेळापत्रक –
२३ फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
२४ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, बंगळुरू
२५ फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू
२६ फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
२७ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, बंगळुरू
२८ फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, बंगळुरू
२९ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
१ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, बंगळुरू
२ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू
३ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
४ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, बंगळुरू
५ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
६ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
७ मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
८ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, दिल्ली
९ मार्च- मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली
१० मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
११ मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, दिल्ली
१२ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली
१३ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली
१५ मार्च- दिल्लीत एलिमिनेटर
१६ मार्च – दिल्लीत फायनल