PAK W vs SRI W Why Nilakshi de Silva was not out : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरू झाला. यावर्षी महिला टी-२० विश्वचषक संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळवला जात आहे, जो पूर्वी बांगलादेशमध्ये खेळला जाणार होता. अ गटात, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना ३ ऑक्टोबर रोजी झाला, ज्यामध्ये पाकिस्तानने ३१ धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान एक विचित्र वाद पाहायला मिळाला. ज्यामध्ये अंपायरने फलंदाजाला अगोदर आऊट घोषित केले. त्यानंतर लगेच डेड बॉल देण्यात आला, ज्यामुळे फलंदाज नॉट आऊट राहिला.
काय होतं प्रकरण?
श्रीलंकेच्या डावातील ते १३ वे षटक होते. पाकिस्तानकडून नशरा संधू गोलंदाजी करत होती, तर श्रीलंकेची फलंदाज नीलाक्षी डी सिल्वा स्ट्राईकवर होती. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पाकिस्तानने नीलाक्षीविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि मैदानी अंपायरनेही तिला आऊट दिले. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज अंपायरकडे गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर रिप्ले पाहण्यात आला आणि नीलाक्षीला नाबाद घोषित करण्यात आले. त्याचबरोबर एलबीडब्ल्यूचे अपील केलेला चेंडू डेड बॉल घोषित करण्यात आला. कारण वास्तविक, नशरा गोलंदाजी करत असताना तिच्या कमरेभोवतीचा रुमाल खाली पडला. त्यामुळे नीलाक्षीचे लक्ष विचलित झाले आणि तिने अंपायरकडे तक्रार केली. त्यानंतर अंपायरने तो डेड बॉल घोषित केला.
डेड बॉलबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो?
जेव्हा फलंदाज चेंडूचा सामना करायला जातात, तेव्हा त्यांना खूप लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळेच फलंदाजांसमोर म्हणजे स्ट्रेटला ब्लॅक स्क्रीन लावली जाते, जेणेकरून त्यांचे लक्ष कोणत्याही प्रकारे विचलित होऊ नये. अशा परिस्थितीत गोलंदाजाची टोपी किंवा रुमाल पडल्यास फलंदाजाचे लक्ष विचलित होते आणि त्यामुळे त्याला डेड बॉल घोषित केले जाते. अशा प्रकारची कोणतीही घटना ज्यामध्ये फलंदाज म्हणू शकतो की तो विचलित झाला आहे. ज्यामुळे तो फलंदाजीसाठी पूर्णपणे तयार नव्हता आणि चेंडू डेड बॉल घोषित केला जातो.
हेही वाचा – IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
पाकिस्तानने श्रीलंकेला दिले होते सोपे लक्ष्य –
श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने धावफलकावर ११६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजीची अवस्था आणखी बिकट झाली. कारण त्यांच्या फलंदाजांची पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे भंबेरी उडाली. कारण त्यांच्या कोणत्याच खेळाडूला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरतात. मधल्या फळीतील फलंदाज नीलाक्षी डी सिल्वाने विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र, जीवनदान मिळूनही तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही.