Women’s T20 World Cup 2024 Venue: महिलांचा टी-२० विश्वचषक २०२४ यंदा खेळवला जाणार आहे. हा विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार हे निश्चित होते. पण आता या विश्वचषकाचे सामने बांगलादेशमध्ये होणार नसून आयसीसीने नव्या ठिकाणाची घोषणा केली. बांगलादेशमधील अराजकतेमुळे आणि तेथील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने टी-२० विश्वचषकाचे सामने आता दुसऱ्या देशात आयोजित केले जात आहेत, याची माहिती आयसीसीने मंगळवारी २० ऑगस्ट रोजी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबरमध्ये होणारा महिला टी-२० विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार नसून आता संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे, तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडेच (BCB) या स्पर्धेचे यजमानपद असेल. या स्पर्धेचे आयोजन सुरू ठेवेल. नुकत्याच झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – 39 Runs In An Over: एका षटकात ३९ धावा… ‘या’ फलंदाजाने मोडला युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये ६ षटकार

आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”बांगलादेशमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल मी बीसीबी संघाचे आभार मानू इच्छितो, परंतु सहभागी संघांपैकी अनेक सरकारने बांगलादेशमध्ये जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाले नाही. बांगलादेशकडेच या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद असेल.भविष्यात बांगलादेशमध्ये आयसीसी जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेनेही या स्पर्धेचे सामने त्यांच्या देशात खेळवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु आयसीसीने आता महिला टी-२० विश्वचषक २०२४ यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास

ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, “भविष्यात बांगलादेशमध्ये ICC स्पर्धा खेळवली जाईल अशी आम्हाला आशा आहे. मी बीसीबीकडून या स्पर्धेचे सामने खेळवण्यासाठी सहमती दर्शवल्याबद्दल अमिराती क्रिकेट बोर्ड आणि पाठिंबा दिल्याबद्दल श्रीलंका व झिम्बाब्वे या देशांचेही आभार मानतो. २०२६ मध्ये त्या दोन्ही देशांमध्ये ICC जागतिक स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत..”

Women’s T20 World Cup 2024 कधीपासून सुरू होणार?

महिला टी-२० विश्वचषक २०२४ येत्या ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान खेळवला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी-२० महिला विश्वचषकातील पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. याआधी संघ वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens t20 world cup shifted out of bangladesh icc confirms uae as new venue for tournament bdg