Barbie song in press conference: बार्बी आणि ओपेनहाइमर हे दोन्ही चित्रपट जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये खूप गाजत आहेत. सध्या या दोन्ही चित्रपटातील गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर तेजी आली आहे. कसोटी इतिहासातील सर्वात मोठी मानली जाणारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. शेवटच्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेसाठी आलेल्या बेन स्टोक्सचा मायक्रोफोन मार्क वुडने हायजॅक करून त्यावर बार्बी गाणे वाजवले आणि एकच हशा पिकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, पत्रकार परिषदेत बेन स्टोक्सला प्रश्न केला जात होता की, तेवढ्यातच मागून ‘अ‍ॅम अ बार्बी गर्ल’ हे गाणं वाजायला सुरुवात झाली. सुरुवातीला बेन स्टोक्सला कळाले शकले नाही की, नक्की काय होत आहे? त्यानंतर जेव्हा इंग्लंडचा कर्णधार स्वतःच हसायला लागला तेव्हा सर्वांना कळल की त्याची कोणीतरी फिरकी घेतली आहे. यासर्व प्रकारानंतर स्टोक्सला सांगण्यात आले की, या सगळ्यामागे त्याचा सहकारी आहे. स्टोक्सने वर पाहिले आणि तिथे मार्क वुड असल्याचे त्याने पटकन ओळखले. मार्क वुडने त्याचा मायक्रोफोन हायजॅक केला होता. यासर्व प्रकारावर स्टोक्सही हसायला लागला आणि त्याने ‘वुडी…’ असा आवाज दिला. आता या मजेशीर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ओव्हल येथे आजपासून सुरू होणाऱ्या अंतिम अ‍ॅशेस कसोटीसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया सध्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या मालिकेतील तीन सामन्यांत ७६.७५ च्या महागड्या सरासरीने अवघ्या चार विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनवर इंग्लंडचा संघ जास्त अवलंबून आहे. पण अँडरसन एवढ्या तब्बल ६८९ कसोटी विकेट्स इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या आहेत, त्याने नुकत्याच एका वृत्तपत्राच्या स्तंभात ठणकावून सांगितले की, “माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही.”

यावर कर्णधार स्टोक्स म्हणाला, “जेम्स अँडरसन हा क्रिकेटमधील एक महान वेगवान गोलंदाज आहे. अजूनही तो त्याच लयीत गोलंदाजी करताना दिसत आहे, जो तो दोन वर्षांपूर्वी होता. या मालिकेत त्याच्या गुणवत्तेला अनुसरून तितका प्रभाव पाडण्यात अपयश जरी आले असले तरी तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.” स्टोक्सने अँडरसनचा दीर्घकाळ नवीन चेंडूने गोलंदाजी करणारा साथीदार असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडचेही कौतुक केले. ब्रॉड १८ विकेट्ससह अ‍ॅशेस मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. तो लॉर्ड्सवर आयर्लंडविरुद्ध या मोसमातील सलग सहावी कसोटी खेळणार गोलंदाज असणार आहे. अँडरसननंतर ६०० कसोटी विकेट्स घेणारा तो केवळ दुसरा वेगवान गोलंदाज ठरला.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद सिराज भारतात परतला, जाणून घ्या

मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्याने इंग्लंडची निराशा झाली

अ‍ॅशेसबद्दल बोलायचे झाल्यास, स्टोक्स आणि संपूर्ण संघ २००१ नंतर प्रथमच परदेशी भूमीवर अ‍ॅशेस मालिका जिंकण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखण्याचा प्रयत्न करतील. मँचेस्टरमधील चौथी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wood eases englands tension ahead of fifth ashes test english captain laughs at press conference avw