Neeraj Chopra in World Athletics Championships 2023: नीरज चोप्राने यंदा बुडापेस्ट येथे पार पडलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मागे टाकत नीरज चोप्राने ८८. ७ मी लांब भाला फेकून इतिहास रचला आहे. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं पण हे आव्हान लीलया पेलून आज नीराज चोप्रा जगज्जेता म्हणून चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज चोप्रा व नदीमला सुवर्ण व रौप्य पदकासह मिळाले ‘इतक्या’ लाखांचे बक्षीस

जगज्जेता नीरज चोप्राने सुवर्ण पदकासह मोठी बक्षिसाची रक्कम सुद्धा मिळवली आहे. प्राप्त माहितीनुसार, नीरजला तब्बल $70,000 (जवळपास ₹58 लाख) चे रोख पारितोषिक मिळाले आहे. तर नीरज चोप्राला विजयासाठी खूप मेहनत करायला भाग पाडणारा उपविजेता, रौप्य पदक प्राप्त पाकिस्तानचा अर्शद नदीम याने सुद्धा स्पर्धेत स्वतःची बेस्ट कामगिरी करून दाखवली आहे. वर म्हटल्याप्रमाणे नदीमने तिसऱ्या फेरीत ८७. ८२ मीटर लांब भाला फेकला होता जे त्याच्या स्वतःच्या रेकॉर्डमधील सर्वाधिक लांबीचे अंतर आहे. यासाठी नदीमने रौप्य पदक जिंकले असून त्याला तब्बल ३५,००० डॉलर म्हणजेच २९ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

Video: नीरज चोप्राचा गोल्डन थ्रो इथे पाहा

हे ही वाचा<< Neeraj Chopra Wins Gold : सुवर्णपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “पदक जिंकणं म्हणजे…”

दरम्यान, नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (८४.७७ मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (८४.१४ मीटर) यांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भालाफेक या क्षेत्रातील भारताचे भविष्यातील चेहरे सुद्धा समोर आल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World athletics championship neeraj chopra won how much prize money with pakistani arshad nadeem watch throw video svs