पीटीआय, बुडापेस्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

World Athletics Championships भारतीय पुरुष रिले संघाने जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत २ मिनिटे ५९.०५ सेकंद अशी वेळ देताना आशियाई विक्रमाची नोंद केली. या कामगिरीसह भारतीय पुरुष संघाने जागतिक स्पर्धेची अंतिम फेरीदेखील गाठली.

भारतीय संघात मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वारियाथोडी, राजेश रमेश यांचा समावेश होता. पात्रता फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक मिळवला. अमेरिकन संघाने २ मिनिटे ५८.४७ सेकंद अशी वेळ दिली. पात्रता फेरीत दुसरा क्रमांक मिळवल्याने भारतीय संघ या स्पर्धा प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरला.

हेही वाचा >>>अल्कराझ-जोकोविचमध्ये द्वंद्व; अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आजपासून

या स्पर्धा प्रकारात यापूर्वीचा २ मिनिटे ५९.५१ सेकंदाचा आशियाई विक्रम जपानच्या नावावर होता. भारतीय संघ अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला असला, तरी भारतीय संघाने ग्रेट ब्रिटन (२ मिनिटे ५९.४२ सेकंद) आणि जमैका (२ मिनिटे ५९.८२ सेकंद) या अव्वल संघांपेक्षा सरस वेळ दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World athletics championships asian record for indian men relay team amy
Show comments