Indian Relay Team in World Athletics Championships 2023: हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या 4×400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये भारताला आतापर्यंत एकही पदक मिळालेले नाही. यावेळी देश नीरज चोप्राची वाट पाहत होता. दरम्यान, भारतीय पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाने शनिवारी चमकदार कामगिरी केली आणि भारतासाठी आणखी एका पदकाच्या आशा उंचावल्या. भारतीय पुरुष रिले संघाने 4×400 मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने हीट १ मध्ये धाव घेतली आणि दुसरे स्थान मिळविले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. भारतीय पुरुष संघाने 4×400  मीटर रिले शर्यतीत २:५९.०५ अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता (२ मिनिटे ५९:५१ सेकंद). भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-१ मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे ५८.४७ सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती. जमैका (२:५९:८२ सेकंद), फ्रान्स (३:००:०५ से.) आणि इटली (३:००:१४ से.) आणि नेदरलँड (३:००:२३ से.) यांनी हीट-२ मधून अंतिम फेरीत प्रवेश केला.

रिले शर्यतीत भारताची सुरुवात संथ होती

या रिले शर्यतीत भारताकडून संथ सुरुवात झाली होती. मोहम्मद अनस याहियाने संघाला संथ सुरुवात करून दिली. पहिल्या फेरीनंतर भारत सहाव्या क्रमांकावर होता. यानंतर अमोज जेकबने संघाचा वेग वाढवला आणि भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. यानंतर मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी आपल्या उत्कृष्ट वेगाच्या जोरावर शेवटच्या दोन टप्प्यात भारताला क्रमांक एकवर ठेवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे इतिहास रचत भारतीय रिले संघाने प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपमध्ये टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? श्रेयस अय्यर, विराट, के. एल. राहुल कुठे खेळणार? जाणून घ्या

पहिल्या टप्प्यानंतर भारत सहाव्या स्थानावर होता पण अमोजच्या शानदार धावाने त्याला दुसऱ्या स्थानावर नेले. अजमल आणि राजेश रमेश यांनी केवळ ती आघाडी कायम राखण्यात चांगली कामगिरी केली आणि संघाला २:५९.०५ सेकंदाचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करण्यात मदत केली. भारतीय चौकडी या शर्यतीत पहिले स्थान घेईल असे क्षणभर वाटत होते, पण ते दोन सेकंदांनी हुकले. यापूर्वी रिले शर्यतीत पुरुषांचा आशियाई विक्रम २:५९.५१ सेकंद होता, जो जपानी संघाने बनवला होता. पण आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या देशांच्या यादीतही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीचा अंतिम सामना रविवारी रात्री खेळवला जाईल.

Story img Loader