World Athletics Championships 2023: बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये भारताला फक्त एकच पदक (सुवर्ण) मिळाले. नीरज चोप्राने हे सुवर्णपदक भारताला भालाफेकमध्ये मिळवून दिले. तसे, या चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीतही भारताकडून पदक अपेक्षित होते, परंतु भारतीय खेळाडूंना ती कामगिरी करता आली नाही. पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीत मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने पाचवे स्थान पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय पुरुष संघाने शर्यत पूर्ण करण्यासाठी २मिनिटे ५९.९२ सेकंद घेतले. यूएसएने जागतिक विक्रम (२ मिनिटे ५७.३१ सेकंद) केला आणि या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी, फ्रेंच संघाने रौप्यपदक (२ मिनिटे ५८.४५ सेकंद) आणि ग्रेट ब्रिटनने (२ मिनिटे ५८.७१ सेकंद) कांस्यपदक जिंकले. जमैकाच्या पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीत चौथे स्थान पटकावले.

हेही वाचा: International Beach Tennis Championships: आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताची घोडदौड कायम; उन्नत, विश्वजीतची शानदार कामगिरी

पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीच्या पात्रता फेरीत भारतीय खेळाडूंनी दणका दाखवला. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने इतिहास रचला आणि प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. यादरम्यान भारतीय संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीत २ मिनिटे ५९.०५ सेकंद वेळ नोंदवून आशियाई विक्रमही मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता (२ मिनिटे ५९.५१ सेकंद). एकूण क्रमवारीत भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

पारुल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली

दुसरीकडे, पारुल चौधरीला महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. पारुल चौधरी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ११व्या स्थानावर राहिली. पारुलने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी ९ मिनिटे १५.३१ सेकंद घेतले, हा राष्ट्रीय विक्रम होता. यासह पारुलला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरविण्यात नक्कीच यश आले.

हेही वाचा: Neeraj Chopra Wins Gold: सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आई झाली भावूक; म्हणाली, “तो देशाचाच मुलगा…”

विशेष म्हणजे नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत ८८.१७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता. पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याला यश आले. या स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीमही सहभागी झाला होता. त्याने रौप्य पदक जिंकले. अर्शदने ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World athletics championships indian team misses out on medal in 4x400m parul chowdhary sets national record avw
Show comments