Javelin Throw Neeraj Chopra World Championships Final: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. त्याची आज म्हणजेच रविवारी (२७ ऑगस्ट) अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत नीरजची नजर प्रथमच सुवर्णपदकावर असेल. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या या खेळाडूला केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी अंतिम फेरी जिंकून आणखी एक सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन पोस्टर बॉय नीरज चोप्राने शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकचे केवळ एकाच थ्रोमध्ये तिकीट पक्के केले नाही तर जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश मिळवला. उशीरा व्हिसामुळे शेवटच्या क्षणी बुडापेस्टला पोहोचलेले किशोर जेना आणि डीपी मनू यांनीही भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये एकाच स्पर्धेत तीन भारतीयांनी एकत्र अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८८.७७ मीटर भालाफेक केली. ही त्याची मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

अंतिम फेरी गाठण्यासाठी अव्वल १२ थ्रोअरमध्ये स्थान मिळविले

नीरजने अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेल्या १२ थ्रोर्समध्ये अव्वल स्थान पटकावले. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी वैयक्तिक पात्रता मानक ८३मीटर होते, तर ८५.५०मीटर हे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मानक होते. नीरजने एकाच थ्रोमध्ये दोन्ही लक्ष्य पार केले.

हेही वाचा: Asia Cup 2023: लष्करापासून ते पाकिस्तानी रेंजर्सपर्यंत कशी असेल आशिया कप २०२३ची सुरक्षा व्यवस्था? जाणून घ्या

नीरजसह तिघांनी ८३ मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकला

फायनलमध्ये पोहोचलेल्या १२ थ्रोर्सपैकी फक्त तिघांनी ८३ मीटरचे वैयक्तिक पात्रता मानक पार केले. नीरज चोप्रा व्यतिरिक्त यामध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम (८६.७९) आणि टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेजे (८३.५० मी) यांचा समावेश आहे. उर्वरित नऊ थ्रोर्सनी ८३ मीटरपेक्षा कमी कामगिरीसह अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत तीन भालाफेकपटूंना परवानगी दिली आहे. गतविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स पात्रता फेरीतच पराभूत झाला. त्याने ७८.४९ मीटर फेक केला.

पाकिस्तानचा अर्शद अंतिम फेरीत नीरजला आव्हान देईल

जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम बराच वेळ दुखापतग्रस्त होता. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ९० मीटर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अर्शद या मोसमात कोणत्याही मोठ्या स्पर्धेत सहभागी झाला नाही, पण येथे त्याने ७०.६३ मीटरच्या थ्रोने सुरुवात केली आणि ८६.७९ मीटरच्या जबरदस्त थ्रोने तो अंतिम फेरीतील स्पर्धेसाठी पात्र ठरला. नीरजनंतरची हा सर्वोत्तम थ्रो होता, तो ब गटात अव्वल ठरला. अंतिम फेरीत नीरज आणि अर्शद यांच्यात रंजक लढत अपेक्षित आहे.

हेही वाचा: KL Rahul: भारत-पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, राहुलने केला विकेटकीपिंगचा कसून सराव, Video व्हायरल

नीरज आणखी एका सुवर्णपदकासाठी सज्ज झाला आहे

२०१६ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप – सुवर्ण

२०१६ दक्षिण आशियाई खेळ – सुवर्ण

२०१८ एशियाड – सुवर्ण

२०१८ राष्ट्रकुल खेळ – सुवर्ण

२०२० टोकियो ऑलिंपिक – सुवर्ण

२०२२ डायमंड लीग – सुवर्ण

हेही वाचा: World Championships: भारताचा पोस्टर बॉय नीरज आणखी एका सुवर्ण पदकासाठी सज्ज, अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शदला देणार आव्हान

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या थेट प्रक्षेपणाशी संबंधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत:

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकचा अंतिम सामना कधी खेळला जाईल?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकची अंतिम फेरी २७ ऑगस्टला (रविवार) होणार आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकचा अंतिम सामना कोठे खेळला जातो?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकचा अंतिम सामना हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये होणार आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकचा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकची अंतिम फेरी भारतीय वेळेनुसार रात्री ११:४५ वाजता सुरू होईल.

मी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकची अंतिम फेरी कुठे पाहू शकतो?

दुर्दैवाने चाहत्यांसाठी, अंतिम सामना भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार नाही. मात्र, तो नीरज चोप्राचा सामना ऑनलाइन पाहू शकतो. चाहते जिओ सिनेमाच्या अ‍ॅप आणि वेबसाइटवर इव्हेंट लाईव्ह पाहू शकतात. Loksatta.com वर तुम्ही जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपशी संबंधित बातम्या वाचू शकता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World athletics neeraj chopra will make history know when and where you will be able to watch the golden boy match avw
Show comments