World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. तिने तिसऱ्या फेरीत थायलंडच्या रॅट्चनॉक इंटानॉन हिचा २१-१६, २१-१९ असा पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन फेऱ्या जिकंलेल्या सायनाने पहिला गेम सायनाने २१-१६ असा सहज जिंकला. दुसरा गेम मात्र अटीतटीचा झाला. या गेममध्ये इंटानॉन हिने जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. १५ गुणांपर्यंत सायना आणि इंटानॉन यांच्यात अत्यंत अटीतटीचा सामना रंगला. त्यांनतर मात्र सायनाने आपला अनुभव पणाला लावला आणि सामना जिंकला. केवळ २ गुणांच्या फरकाने सायनाने दुसरा गेम जिंकत विजय सामना आपल्या नावे केला.

पुढील फेरीत तिचा सामना कॅरोलिना मरिन हिच्याशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World badminton championships 2018 saina nehwal quarter finals carolina marin