फिनलँड येथे सुरू असलेल्या ३८व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत तीन वेळा आशियाई विजेता शिवा थापा (६० किलो) आणि माजी युवा विश्वविजेता सचिव सिवाच (५२ किलो) याच्यासह सहा भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठून पदकाची निश्चिती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या थापाने पोलंडच्या डॉमिनिक पलकचा उपांत्यपूर्व फेरीत ५-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याची रशियाच्या मिखाईल व्हार्लामोव्हशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे सिवाचने रशियाच्या तामिर गालानोव्हला ४-१ असे नामोहरम केले. त्याची उपांत्य फेरीत किरगिझस्तानच्या अझत उसेनोलीव्हशी लढत होईल.

याशिवाय राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो), कविंदर सिंग बिश्त (५६ किलो), दिनेश्या डागर (६९ किलो) आणि नवीन कुमार (+९१ किलो) यांनीदेखील उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World boxing championships