जगज्जेत्या स्पेन संघाने बलाढय़ फ्रान्सचा १-० असा पराभव करून २०१४ फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी स्पर्धेत आपल्या गटात आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रात प्रेडो रॉड्रिगेझने केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनने फ्रान्सला एका गुणाने मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. नेदरलँड्सने रोमानियावर ४-० असा दणदणीत विजय मिळवून सहाव्या सामन्यातील सहाव्या विजयाची नोंद केली.
नेदरलँड्स संघाने लुईस व्हॅन गाल यांच्या प्रशिक्षकपदाखाली सुरेख कामगिरी करत ‘ड’ गटात सात गुणांच्या फरकाने आघाडी घेतली आहे.
 राफेल व्हॅन डर वार्ट याने ११व्या मिनिटाला गोल केल्यानंतर रॉबिन व्हॅन पर्सीने (५५व्या, ६४व्या मिनिटाला) दोन गोलांची भर घातली. त्यानंतर जर्मेन लेन्स याने ८९व्या मिनिटाला गोल झळकावत नेदरलँड्सला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या क्रमांकावरील हंगेरीने तुर्कस्तानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखला.
‘ह’ गटात इंग्लंडला मॉन्टेनेग्रोविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागल्यामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. वेन रूनीने इंग्लंडला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली तरी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. मॉन्टेनेग्रोने दोन गुणांच्या फरकाने अव्वल स्थान घेतले आहे.
युरोपियन देशांच्या गटात दादा संघांनी आपले वर्चस्व कायम राखले. मारियो बालोटेलीच्या दोन गोलांच्या बळावर बलाढय़ जर्मनीने कझाकस्तानचा ४-१ असा धुव्वा उडवला.
चेक प्रजासत्ताक संघाने अर्मेनियावर ३-० असा सहज विजय साकारला. क्रोएशियाने वेल्सचा २-१ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. पोलंडने सॅन मॅरिनो संघाचा ५-० असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा