कोपेनहेगन : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळण्याचे स्वप्न शनिवारी भंग पावले. इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित कुन्लावुत वितिदसर्नने प्रणॉयचा १८-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव केला. प्रणॉय कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रणॉयने जागतिक स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित व्हिक्टर अॅक्सेलसेनवर विजय मिळविणाऱ्या प्रणॉयचे प्रयत्न उपांत्य फेरीत तोकडे पडले. वितिदसर्नने १ तास १६ मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीनंतर विजय नोंदवला. उत्तम बचाव आणि कमालीचा आक्रमक खेळ वितिदसर्नच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. पहिल्या गेमला ५-५ अशा बरोबरीनंतर सलग सात गुण घेत १२-५ अशी आघाडी मिळविल्यानंतर प्रणॉयने आघाडी कायम राखत पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेमला चित्र नेमके पालटले. या वेळी ६-७ अशा पिछाडीवर असताना सलग सात गुण घेत वितिदसर्नने मोठी आघाडी घेतली. १५-१३ अशा स्थितीत वितिदसर्नने पुन्हा एकदा सलग सहा गुण घेत दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या निर्णायक गेमला वितिदसर्नने निर्विवाद वर्चस्व राखले.

जागतिक पदक मिळवणारा पाचवा भारतीय

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारा प्रणॉय पाचवा पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी प्रकाश पदुकोण, बी. साई प्रणित, लक्ष्य सेन हे कांस्य, तर किदम्बी श्रीकांत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. प्रणॉयच्या कामगिरीने २०११ पासून स्पर्धेत एक तरी पदक जिंकण्याची मालिका कायम राहिली. भारताकडून महिला विभागात सिंधूने एका सुवर्णपदकासह (२०१९) पाच, तर सायना नेहवालने दोन पदके मिळवली आहेत.