मुंबई : जागतिक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व राखले. पुरुष, महिला एकेरीसह दुहेरी आणि दोन्ही विभागांत भारताने सांघिक विजेतेपदही मिळविले. एकेरीत संदीप दिवे आणि रश्मी कुमारी विजेते ठरले. मलेशियात झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या संदीप दिवेने भारताच्याच अब्दुल रेहमानचा १-२५, २५-१९, २५-२२ असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकच्या लढतीत भारताच्या श्रीनिवासने प्रशांत मोरेला २५-१२, २५-२० असे नमवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत रश्मी कुमारीने भारताच्याच राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या काजल कुमारीला २५-२०, २५-१६ असे पराभूत केले. रश्मीचे हे तिसरे विजेतेपद ठरले. महाराष्ट्राच्या नीलम घोडकेने कांस्यपदक मिळविताना देबजानी तामूलीचा २५-२१, २५-७ असा पराभव केला. पुरुष सांघिक गटात भारताने श्रीलंकेचा आणि महिला विभागात अमेरिकेचा ३-० अशा फरकाने पराभव केला.  पुरुष दुहेरीत  प्रशांत मोरे आणि अब्दुल रेहमान जोडीने अंतिम सामन्यात के. श्रीनिवास आणि संदीप दिवे जोडीवर ०-२५, २५-२३, २५-१५ असा विजय मिळविला. महिला दुहेरीत रश्मी कुमारी व नीलम घोडके जोडीने काजल कुमारी व देबजानी तामूलीला २५-८, २५-० असे सहज पराभूत करून सुवर्णपदक मिळविले.