मुंबई : भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर १४व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली आणि १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.

विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळ जगतात त्या प्रकारे वर्चस्व गाजवू शकेल असा कुणी भारतीय निर्माण होईल का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. गुकेशने १८व्या वर्षी थक्क करणारी प्रतिभा, परिपक्वता आणि धैर्य दाखवत या प्रश्नाचे उत्तर जगज्जेता बनूनच खणखणीत दिले. सिंगापूरमध्ये झालेल्या या लढतीत १४व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता. लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही. पण गुकेशचे कौशल्य आणि मानसिक स्थैर्य केवळ या लढतीपुरते मर्यादित नव्हते. हे संपूर्ण वर्ष तो उत्कृष्ट खेळ करत आहे. एप्रिल महिन्यात त्याने कँडिडेट्स स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. ती स्पर्धा जिंकणारा आणि त्यामुळे जगज्जेतेपदासाठी आव्हानवीर ठरणारा तो सर्वांत युवा बुद्धिबळपटू होता. ती स्पर्धा प्रत्यक्ष जगज्जेतेपदाच्या लढतीपेक्षा खडतर होती. सप्टेंबर महिन्यात हंगेरीत झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. त्यात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून गुकेशने मोलाचे योगदान दिले होते.

Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात
Magnus Carlsen match fixing
विश्लेषण : जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदासाठी कार्लसनकडून ‘फिक्सिंग’? नक्की प्रकरण काय?
Image Of Manu Bhaker
Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न, १७ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण
Arjun Erigaisi latest marathi news
गुकेशच्याही वरचे रँकिंग… जगात पहिल्या पाचात.. तरीही जगज्जेतेपदासाठी अर्जुन एरिगेसी गुकेशसमोर आव्हानवीर का ठरणार नाही?
Koneru Humpy wins historic Rapid chess world title
कोनेरू हम्पी… जलद बुद्धिबळाची विश्वसम्राज्ञी
Chess History
History of chess: बुध्दिबळाची जन्मभूमी कुठली; भारत की चीन?

हेही वाचा : दृढनिश्चयाचा विजय!

पाच वेळचा बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने शेवटचे जागतिक अजिंक्यपद २०१२मध्ये पटकावले. त्यानंतर १२ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ जगज्जेता पाहण्याची संधी जगभरच्या भारतीय बुद्धिबळ रसिकांना मिळाली. २०२३मध्ये पाच वेळा जगज्जेतेपद जिंकल्यानंतर कार्लसनने यापुढे या लढतीत भाग न घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत झालेल्या लढतीत गतवर्षी डिंग लिरेनने बाजी मारली. त्याच लिरेनला आता गुकेशने निर्धारित १४ डावांच्या लढतीत हरवून दाखवले.

डिसेंबर महिन्याच्या ११ तारखेला आनंदचा वाढदिवस असतो. याच महिन्याच्या सुरुवातीस भारताचा अर्जुन एरिगेसी २८०० एलो गुणांकन मिळवणारा आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला होता. आता गुकेश आनंदनंतरचा दुसरा भारतीय जगज्जेता बनला. बुद्धिबळात भारताची ओळख खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणाऱ्या आनंदसाठी यापेक्षा उत्तम वाढदिवसाची भेट असूच शकत नाही.

गेल्या दशकभरापासून मी या क्षणाचे स्वप्न बघत होतो. १४वा डाव ज्याप्रकारे सुरू होता, त्यात मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. पण मला प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकण्याची संधी मिळाली आणि मी तिचा फायदा घेतला. – डी. गुकेश

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

२०१०मधील लढतीचे स्मरण

२०१०मध्ये आनंद बल्गेरियाच्या व्हॅसलिन टोपालोवविरुद्ध पहिल्याच डावात हरला नि पिछाडीवर पडला.

पण त्यावेळी १२ डावांच्या त्या लढतीत त्याने शेवटच्या डावात काळ्या मोहऱ्यांनिशी खेळून टोपालोववर बाजी उलटवली आणि तो जगज्जेता बनला.

२०२४मध्ये गुकेशही पहिल्या डावात पराभूत झाला. त्यानेही १४ डावांच्या लढतीत शेवटच्या डावात काळ्या मोहऱ्यांनिशी जिंकून लिरेनवर बाजी उलटवली.

१८व्या वर्षी १८वा जगज्जेता

गॅरी कास्पारॉव आणि मॅग्नस कार्लसन हे २२व्या वर्षी जगज्जेते बनले. यांतील कास्पारॉवचा विक्रम गुकेशने मोडला आणि तो १८व्या वर्षीच जगज्जेता बनला. आनंद पाच वेळा जगज्जेता होता, पण तो २००७मध्ये पहिल्यांदा वादातीत जगज्जेता बनला.

Story img Loader