जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत १२ फेऱ्यांनंतरचा विश्रांतीचा दिवस हा जगज्जेता डिंग लिरेन आणि आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यासाठी आरामाचा नसून भरपूर धामधूमीचा ठरणार आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर त्यांचे सहकारी, नातेवाईक आणि बहुसंख्य चाहते यांनासुद्धा झोप लागली नसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झोप न लागण्यावरून एक गोष्ट आठवते. पटावर अतिशय शांत आणि मख्ख चेहऱ्याने बसणाऱ्या माजी विश्वविजेत्या अनातोली कार्पोवला स्पर्धेदरम्यान झोप लागत नसे. त्यासाठी त्याने डॉ. झुखार या प्रसिद्ध संमोहनकर्त्याची मदत घेतली होती. याउलट त्याला पराभूत करणाऱ्या नायजेल शॉर्ट या आव्हानवीराने आपल्या खोलीत बायको आणि लहान मुलगा यांना सामावून घेतले होते. ‘‘अगदी घरी असल्यासारखे वाटते आणि मुलाच्या सहवासाने सगळे मानसिक तणाव दूर होतात,’’ असे शॉर्टचे म्हणणे होते.
हेही वाचा : IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
डिंगचे परिवर्तन
गेल्या जगज्जेतेपदाच्या विजयानंतर मानसिक दबावामुळे ढेपाळलेल्या चिनी जगज्जेत्याला त्याच जगज्जेतेपदाच्या तणावपूर्ण वातावरणाने पुन्हा आपली लय मिळवून दिली आहे असे भासते. बाराव्या फेरीतील डिंगचा विजय हा एखाद्या जगज्जेत्याला साजेसा होता. त्याचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की गुकेशने दिलेला हत्तीसुद्धा त्याने बाद केला नाही आणि एकाहून एक सुंदर चाली रचून गुकेशला ३९ चालीत शरण आणले. प्रज्ञानंद आणि वैशाली या भावंडांबरोबर कायम त्यांची आई सावलीप्रमाणे असते. या वेळी डिंगनेही आपल्या आईला बरोबर आणले आहे.
दडपणाखाली गुकेशच्या चुका
अकरावा डाव जिंकल्यावर पुढल्याच डावात गुकेशने या लढतीतील आपली सर्वांत वाईट कामगिरी केली. डिंग एकाहून एक सरस खेळ्या करत असताना गुकेशला सर्वोत्तम खेळ्या करता येत नव्हत्या. मात्र, गुकेश पूर्णपणे निराश नव्हता. तो म्हणाला,‘‘या डावानंतरही लढत ६-६ अशी बरोबरीत आहे. अजून सगळे संपलेले नाही.’’ याच मन:स्थितीत गुकेश राहिला तर त्याला पुनरागमन करायला काहीही हरकत नाही. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मदत केलेला प्रचलित मानसशास्त्रज्ञ पॅडी अपटन याचे मार्गदर्शन गुकेशसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच नाक, कान आणि घसातज्ज्ञ असलेले गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत हेसुद्धा त्याच्याबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी जातात. त्यांचा पाठिंबाही मोलाचा ठरेल.
हेही वाचा : Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
स्पर्धेसाठी विजेत्याला १३ लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस मिळेल. तर, पराभूत खेळाडूला १२ लाख! गम्मत म्हणजे प्रत्येक विजयाला दोन लाख डॉलर्सचा बोनस आहेच. सेंटोसासारख्या नयनरम्य ठिकाणी स्पर्धा भरवून सिंगापूर सरकारने आपल्या पर्यटनाची जाहिरात होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
तेराव्या डावात गुकेशकडे पांढरी मोहरी असल्यामुळे तो विजयासाठी पूर्ण प्रयत्न करेल, कारण अखेरच्या डावात डिंग पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळेल. डिंगला त्याचा जुना सूर पुन्हा गवसू नये यासाठीच गुकेशचे चाहते प्रार्थना करत असणार, हे नक्की.
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)