आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवारी (२७ जून) मुंबईतील एका कार्यक्रमात त्याने हा खुलासा झाला. यावेळी श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन उपस्थित होता. सेहवागने भारतीय संघासाठी तीन विश्वचषक खेळले आहेत. २००३ मध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि २००७ मध्ये ती पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. त्यानंतर २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला.

या कार्यक्रमादरम्यान सेहवागने २०११च्या विश्वचषकातील त्याच्या आठवणी शेअर केल्या. प्रत्येक सामन्यात चौकार मारून सुरुवात करायची होती असे त्याने सांगितले. त्याचवेळी टीम इंडियाला तेव्हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वर्ल्डकप जिंकायचा होता. याशिवाय त्याने तत्कालीन कर्णधार धोनीबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. सेहवाग म्हणाला की, प्रत्येक खेळाडूची स्वतःची सुपरस्टीशन असतात. सचिन नेहमी फलंदाजीला जाण्याआधी गाणे ऐकायचा. मी फलंदाजी करताना गाणे म्हणायचो खिशात लाल रुमाल ठेवायचो. तसेच धोनीनेही त्यावेळी असेच काहीसे केले होते तो काही वेगळा नव्हता.”

Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

हेही वाचा: ICC WC 2023: वर्ल्डकप २०२३चे वेळापत्रक जाहीर होताच सेहवागने केली भविष्यवाणी, म्हणाला, “हे ‘चार’ संघ पोहोचतील फायनलला…”

धोनीविषयी काय म्हणाला सेहवाग?

सेहवागने सांगितले की, “धोनीने संपूर्ण विश्वचषकामध्ये फक्त खिचडी खाल्ली होती. या स्पर्धेतील बहुतांश सामन्यांमध्ये धोनी चांगला फॉर्ममध्ये नसल्याचा खुलासा त्याने केला. मात्र, भारत सामने जिंकत असताना ‘खिचडी’ खाण्याची चाल त्याने सुरूच ठेवली. धोनीने संपूर्ण स्पर्धेत एकही मोठी खेळी खेळली नाही, मात्र अंतिम फेरीत त्याने नाबाद ९१ धावा करत संघाला चॅम्पियन बनवले.”

सेहवाग पुढे म्हणाला, “प्रत्येकाकडे काही ना काही युक्ती होती आणि प्रत्येकजण आपली ती गोष्ट फॉलो करत होता. महेंद्रसिंग धोनीने संपूर्ण विश्वचषकादरम्यान खिचडी खाण्याची युक्ती सुरू ठेवली होती. तो म्हणायचा की मी धावा करत नसलो तरी ही युक्ती काम करत आहे आणि आम्ही सामना जिंकत आहोत. काहीजण याला अंधश्रद्धा म्हणतील पण प्रत्येकाचा एक विश्वास असतो.”

हेही वाचा: Ruturaj Gaikawad: वेंगसरकर यांनी गायकवाडच्या निवडीबाबत जाफरला सुनावले; म्हणाले,” प्रत्येक खेळाडू स्पर्धेत असतो म्हणजे काय?”

१५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना

विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन आणि अंतिम सामने खेळवले जातील. इतर नऊ ठिकाणे बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे आहेत. सराव सामन्यांच्या यजमानपदाचा मान हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमला मिळाला आहे. ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत-पाकिस्तान मेगा मॅच १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.