क्रिकेट विश्वचषकाचे पडघम वाजू लागलेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील ३० संभाव्य खेळाडूंची यादी देखील ‘बीसीसीआय’ने जाहीर केली आहे. यांपैकी अंतिम पंधरा खेळाडू येत्या ७ जानेवारीला निवडले जातील. विश्वविजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. कारण, गेल्या चार वर्षांत भारतीय संघाचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला आहे. निवडल्या जाणाऱया संघात युवा खेळाडूंचा भरणा असणार आहे. त्यामुळे संघाची रचना कशी असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
भक्कम धावसंख्या उभारताना संघाची सुरूवात चांगली करून देण्याची जबाबदारी सलामीवीरांवर असते. २०११ च्या विश्वचषकात गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी सलामीवीरांची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली होती. यंदा मात्र, हे तिघेही संघात नाहीत. सलामीसाठी शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, मुरली विजय हे पर्याय टीम इंडियाकडे उपलब्ध आहेत. यंदाच्या विश्वचषकासाठी यातील कोणत्या दोन खेळाडूंवर संघाच्या धावसंख्येचा ‘श्रीगणेशा’ करण्याची जबाबदारी देता येईल.

Story img Loader