ICC ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये ३० मे पासून होणार आहे. या स्पर्धेत सर्व संघ आपले उत्तमोत्तम खेळाडू घेऊन उतरणार आहेत. लवकरच सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार असून सराव सामन्यांना सुरुवात होणार आहे. अनेक क्रिकेट जाणकारांनी या स्पर्धेतील अंदाज व्यक्त केले आहेत. त्यातच टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल आणि तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल हे दोघे विंडीजला टॉप ४ मध्ये पोहोचवतील, असे मत व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“ख्रिस गेलचा झंजावात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपण पाहिला. तो मोठे फटके खेळून आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारू शकतो. सलामीला त्याने चांगली सुरुवात मिळवून दिली की बाकीचे फलंदाज डाव पुढे नेट चांगली कामगिरी करू शकतील. पण गोलंदाजीच्या आघाडीवर त्यांना थोडेसे लक्ष द्यावे लागणार आहे. तसे झाले तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही”, असे अनिल कुंबळे म्हणाले.

“विंडीज क्रिकेटने जेसन होल्डरचे आभार मानायला हवेत, कारण त्याने अगदी प्रतिकूल परिस्थितीतून विंडीजच्या संघाला वर आणले. त्याने रसल, गेल यासारख्या तडाखेबाज फलंदाजांना चांगला खेळ करण्यासाठी बळ दिले.” असे कुंबळे यांनी नमूद केले.

“गोलंदाजी ही विंडीजच्या संघाची उणी बाजू आहे. प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत करायचे असेल तर त्यांना त्यांच्या गोलंदाजीची बाजू सुधारावी लागेल. त्यांना योग्य वेळी योग्य खेळाडूंना संधी द्यावी लागेल. जर विंडीजला स्पर्धेची चांगली सुरुवात मिळू शकली, तर ते स्पर्धेत उत्तम कामगिरी करू शकतात”, असेही कुंबळे यांनी सांगितले.