३० मे रोजी इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज झाय रिचर्डसन खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धा खेळू शकणार नाहीये. मार्च महिन्यात युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रिचर्डसनच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र विश्वचषकापर्यंत तो व्यवस्थित होईल अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना होती. मात्र त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रिचर्डसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रिचर्डसनच्या जागी केन रिचर्डसनला संघात जागा देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिचर्डसनच्या दुखापतीबद्दल आढावा घेतला. झायने नेट्समध्ये गोलंदाजी करण्याचाही सराव केला, मात्र दुखापतीमुळे तो १०० टक्के कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे झाय रिचर्डसनला वगळून केन रिचर्डसनला संघात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार मानला जातोय.

Story img Loader