WC 2019 BAN vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात बांगलादेशने ६२ धावांनी दमदार विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शाकिब अल हसनने टिपलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेशने अफगाणिस्तानला २०० धावांवरच तंबूत धाडले. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर घोषित करण्यात आले.
या कामगिरीसह शाकिब आलं हसन याने एक अभूतपूर्व विक्रम केला. शाकिबने १ चौकार लगावत अत्यंत संयमी ५१ धावा केल्या. यासह त्याने १० षटकात २९ धावा खर्चून ५ बळी घेतले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्याने स्पर्धेत ४०० धावांचा टप्पा गाठला आणि याच बरोबर त्याने १० बळींचा टप्पादेखील गाठला. विश्वचषक स्पर्धेत शाकिबने ५१ धावांची भागीदारी करत ४७६ धावा केल्या. तर गोलंदाजीतही त्याने १० बळी टिपले. स्पर्धेत ४००पेक्षा अधिक धावा आणि १० बळींचा टप्पा घटणारा शाकिब अल हसन हा विश्वचषक इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला.
Shakib Al Hasan in this World Cup:
6 matches
476 runs
10* wicketsThe first player with 400+ runs and 10+ wickets in a CWC edition. #CWC19 #BANvAFG
— Sampath Bandarupalli (@SampathStats) June 24, 2019
दरम्यान, या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांकडून सुरुवातीला काहीशी झुंज पाहायला मिळाली. पण शाकिबच्या माऱ्यापुढे ते झटपट ढेपाळले. शाकिब अल हसनच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह अशा ५ फलंदाजांना माघारी धाडले. अफगाणिस्तान कडून समीउल्लाह शेनवारीने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. त्या खालोखाल सलामीवीर नैबने ४७ धावांची खेळी केली. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही.
त्याआधी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात फारशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १७ धावांवर लिटन दास माघारी परतला. त्याने केवळ २ चौकार लगावले. तमिम इकबालने शाकिब अल हसनच्या साथीने चांगली खेळी केली. त्या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. पण बॅकफूटवर येऊन फटका मारताना तो नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३६ धावा केल्या. शाकिब अल हसनने मात्र आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पण दुर्दैवाने ५१ धावांवर खेळताना तो पायचीत झाला. शाकिबने केवळ १ चौकार लगावला. मुशफिकूर रहीम आणि शाकिब यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या टप्प्यात मुशफिकूर रहिमने फटकेबाजी करत ४ चौकार व १ षटकार खेचत ८७ चेंडूत ८३ धावा केल्या आणि बांगलादेशला ५० षटकात ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. मुजीबने ३, नैबने २ तर झादरान आणि नबी यांनी १-१ बळी टिपला.